टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकऱ्यांना हर्बल वनस्पती लागवडीची परवानगी द्यावी, अशी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
हर्बल वनस्पती लागवडीची परवानगी दिल्यास नवाब मलिक यांच्या जावयाप्रमाणे शेतकरी श्रीमंत होईल, असे त्यांनी उपरोधिकपणे पत्रात म्हटले आहे.
शेतकरी संकटात असताना शरद पवार यांनी हर्बल वनस्पती लागवडीची परवानगी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची होळी रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या 20 ऑक्टोबरला पेटवण्यात येणार आहे.
या राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक संकटाला शेतकरी तोंड देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की, 2019 साली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जो जीआर काढला तसाच काढू असे सांगितले होते.
मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्र्यांनी तेव्हा जी वचन दिली ती गेली कुठे? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज