टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल मंगळवारी पार पडला. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत होतं.
पण छगन भुजबळ यांच्या मुलाची वर्णी लागली. रुपाली चाकणकर यांची आमदारकीची संधी हुकली असली तरी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आलीय. आता चाकणकर या पुढची तीन वर्षे आयोगाच्या अध्यक्षपदी कामय राहतील.
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी रुपाली चाकणकर यांचंही नाव चर्चेत होतं. पण छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी हट्ट धरल्याने मग रूपाली चाकणकर यांचे नाव मागे पडले. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी पुन्हा संधी मिळालीय.
राज्यात निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला तरी रुपाली चाकणकर यांचं पद मात्र कायम राहील. रुपाली चाकणकर या पुढची तीन वर्षे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. प्रोटोकॉलनुसार या पदाला राज्यमंञीपदाचा दर्जा आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज