mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2026
in क्राईम, मंगळवेढा
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मंगळवेढा ते स्वारगेट (पुणे) बसमध्ये चढत असताना एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने

सोन्याची माळ आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल अत्यंत चालाखीने लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​गर्दीचा घेतला गैरफायदा

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नुरजहा पापामिया काझी (वय ६० वर्षे, मूळ रा. सिंहगड रोड, खडकवासला, पुणे, सध्या रा.खुपसंगी, ता. मंगळवेढा) या रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी दुपारी ०१:३० वाजण्याच्या सुमारास पुणे येथे जाण्यासाठी मंगळवेढा बस स्थानकावर आल्या होत्या.

मंगळवेढा-स्वारगेट बस लागल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना, प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या खांद्यावरील पर्समधून ४० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची लहान मण्यांची सोन्याची माळ आणि ५ हजार रुपये रोख रक्कम (५००, २०० आणि १०० च्या नोटा) जबरदस्तीने व लबाडीने चोरून नेली.

​पोलिसांत गुन्हा दाखल

​आपली चोरी झाल्याचे लक्षात येताच नुरजहा काझी यांनी तातडीने मंगळवेढा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं. ५४६/२०२६, BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

​तपास सुरू:

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे (बक्कल नंबर १६०३) हे करत आहेत. बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

​प्रवाशांना आवाहन:

बस स्थानक किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना महिलांनी आपल्या दागिने व पर्सबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा बस स्थानक

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 29, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
Next Post
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

ताज्या बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा