टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दामाजी कारखाना रोड लगत बायपास येथे आज सोमवार दिनांक 26 रोजी कृष्णा बोअरवेल्स यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक पोपट रणे यांनी दिली.
सोमवार 26 रोजी पहाटे पाच ते सहा यावेळी संगीत विशारद ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव यांचे हरिपाठ होणार आहे. त्यानंतर सकाळी 12 ते आपल्या आगमनापर्यंत भोजन व उपासाची सोय केली असून
सायंकाळी 7 ते 9.30 पर्यंत लातूर येथील हे.भ.प.कृष्णा महाराज जोगदंड यांचे कीर्तन तसेच रात्री 9.30 ते 12 पर्यंत झी टॉकीज फेम बाल कीर्तनकार ह.भ.प.संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन होणार आहे.
यावेळी ह.भ.प.मृदंगाचार्य सूर्यकांत महाराज वाघमारे हे विशेष उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमास आमदार समाधान आवताडे, चेअरमन संजय आवताडे, तीर्थक्षेत्र दामाजी अन्नक्षेत्राचे चेअरमन विष्णुपंत आवताडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, सोलापुर येथील नवनीत हॉस्पिटलचे डॉ.नितीन तोष्णीवाल, डॉ.हिंदुराव काळे,
उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, माजी सरपंच विजयसिंह पाटील, दामाजी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ.अच्युत्य नरुटे, दामाजी नगर ग्रामपंचायतचे सदस्य संजय माळी, प्रगतशील बागायतदार दत्तात्रय जाधव,
दामाजी एक्सप्रेस संपादक दिगंबर भगरे, बावचीचे उपसरपंच दत्तात्रय जाधव, पत्रकार मल्लिकार्जुन देशमुखे, पत्रकार शिवाजी पुजारी, प्रमोद वराळे, पत्रकार प्रमोद बिनवडे ,माजी नगराध्यक्ष अरुण किल्लेदार, पत्रकार समाधान फुगारे, उद्योगपती सिद्धेश्वर रणे,
डोंगरगावचे माजी सरपंच बाळासाहेब कवाळे, बळीराजा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र रणे, सुजित माळी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन
संयोजक पोपट रणे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज