टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील एक अभ्यासू नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ते श्री संत दामाजी कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या कर्तुत्वाने व दातृत्वा ने या भागाला खंबीर असे नेतृत्व करणारा नेता लाभला. असे उदगार मंगळवेढा पंचायत समितीचे विद्यमान मिस्टर सभापती सुधाकर मासाळ यांनी बोलताना व्यक्त केले.
दीपावली सणानिमित्त अंबादास कुलकर्णी यांच्यावतीने मित्र परीवारासाठी 125 किराणा साहित्य किट व पाच किलो साखर वाटप करून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न कुलकर्णी यांनी केला आहे.
कोरोनाच्या महामारीत गोरगरीब जनतेच्या पाठीशी वडील बंधू सारखा हा नेता आपल्या सोबत राहिला, यामुळे कोरोनावरही आपण मात केली,कुलकर्णी यांच्या सारखा नेता खर तर गावोगावी लाभला पाहिजे, घेण्यासाठी अनेक असतात.
देणाऱ्याचे दातृत्व आमच्या सारख्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे,आज त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या दिवाळी सणात देखील दातृत्व रूपातून सहकार्य केल्याचे मत सुधाकर मासाळ यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी सरपंच मल्लीकर्जून बने, माजी सरपंच सिद्धार्थ कोळी, ग्रामपंचायत सदस्य सातीराप्पा सौदे, पोलीस पाटील महादेव शिंदे,रामचंद्र सोमुते, अंबाना पडवळे, अण्णापा कोळी, सिताराम लोहार, शिवानंद कोळीळी,हनुमंत हूगार यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज