टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगोल्यात बाजारादिवशी नेहमी मोबाइल चोरीला जातात. मात्र , त्याचा तपास लागत नाही, परंतु दिवाळी सुटीनिमित्ताने गावी महाविद्यालयीन निघालेल्या युवतीने बॅगेतून मोबाइल चोरणाऱ्या पंढरपूरच्या एकास रंगेहाथ पकडले .
दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील बसस्थानकावर ही घडली.
रामलिंग महादेव पांढरे (अनिलनगर , पंढरपूर ) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. मंगळवेढा तालुक्यातील आरती रघुनाथ खरात हिने फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडोली येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.
महाविद्यालयाला दिवाळी ती सणानिमित्त सुटी असल्याने ती रविवारी कोल्हापूर येथून बसने गावी निघाली होती. ती येथील बसस्थानकावर उतरली.
सोबत मंगळवेढ्याची एक मैत्रीणही होती. बस मंगळवेढ्याची आल्याने दोघी बसमध्ये चढताना संशयियाने ते पुढे जाऊ नयेत, यासाठी दरवाजात हात आडवा केला.
मात्र, एक मिनिटानंतरही त्याने हात बाजूला केला नाही. तसेच त्याने दुसऱ्या हाताने आरती हिच्या खांद्याला अडकवलेल्या बॅगमधून मोबाइल काढून घेतला.
तसेच त्याने त्याच्यामागे उभ्या एका महिलेकडे मोबाइल दिला. त्यानंतर तो निघून जात असताना आरती हिने चोर, चोर अशी आरडाओरड केली. त्यामुळे बसस्थानकातील लोकांनी त्यास पकडले.
त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज