mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निंबाळकर, राम सातपुतेंसाठी फडणवीस आज सोलापुरात, शरद पवारांचा दौरा रद्द; माढा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते-पाटील अर्ज दाखल; ‘या’ दोन नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 16, 2024
in राजकारण, सोलापूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात, भालके कुटुंबियांची घेणार भेट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धैर्यशील मोहिते-पाटील तर भाजपतर्फे विद्यमान खासदार रणजित नाईक-निंबाळकर आणि सोलापुरातील उमेदवार आमदार राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल होणार आहेत.

भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात दाखल होत आहेत तर मोहिते यांच्यासाठी शरद पवार यांचा ठरलेला दौरा अचानक रद्द झाला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे जुना पुणे नाका येथून मिरवणुकीने येऊन जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू होईल.

ती छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक,चार हुतात्मा चौक, डॉ. आंबेडकर चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे सात रस्ता असा मिरवणुकीचा मार्ग असेल.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. ते लातूरच्या विमानतळावर उतरतील. तेथून हेलिकॉप्टरने एमआयटी कॉलेजच्या मैदानावर त्यांचे आगमन होईल.

नारायण पाटील, उत्तम जानकरांच्या भूमिकेकडे माढ्याचे लक्ष

सोलापूर मतदारसंघासाठी राहुल गायकवाड तर माढ्यासाठी रमेश बारसकर या दोन्ही वंचित आघाडीच्या उमेदवारांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी कार्यकत्यांची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. नारायण पाटील व उत्तम जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांसाठी सोलापुरातील सात रस्ता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माढ्यासाठी मोनिका ठाकूर तर सोलापूरसाठी कुमार आशिर्वाद हे काम पहात आहेत.

अपक्ष उमेदवार शिवाजी सोनवणे यांनी सोलापूर तर माढा लोकसभेसाठी श्रीरामचंद्र घुटूकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे मंगळवारी सोलापूरसाठी एकूण २ आणि माढ्यासाठी २ असे ४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.

दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी सोमवारी १६ व्यक्तींनी ३६ अर्ज नेले. आतापर्यंत एकूण ५४ व्यक्तींनी ९४ अर्ज घेऊन गेलेले आहेत. माढा लोकसभेसाठी सोमवारी ३२ व्यक्तींनी ५३ अर्ज नेले. आतापर्यंत एकूण ७९ व्यक्तींनी ११७ अर्ज या मतदारसंघासाठी घेतले.

मोहिते निवडक नेत्यांसोबत येणार सोलापुरात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार सोलापुरात येणार होते.

पण दौरा अचानक रद्द झाल्याने आता मोहिते- पाटील हे शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यांसमवेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.(स्रोत:दिव्य मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
Next Post
ट्विटर वार! भाजपच्या उपऱ्या उमेदवारीवरून  प्राणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना लगावला ‘हा’ टोला; सोलापूरची लेक तुमचंही स्वागत करते..

छावणीचालकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; सातपुते का शिंदे, छावणीचालकांना कोण न्याय मिळवून देणार? ३८ कोटी सरकारने थकविले

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा