टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन हा १ एप्रिल पासून राज्यात सुरू होणार असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांने या योजनेमध्ये आपली नोंदणी करावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यामार्फत ही नोंदणी होणार आहे.
यामध्ये काही अडचणी आल्यास किंवा जाणून बुजून राजकीय दबावातून एखाद्या पात्र लाभार्थ्याला वगळण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी थेट माझ्याशी व माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया येत्या १ एप्रिल २०२५ पासून ग्रामपंचायतीच्या मदतीने सुरु होत आहे.
या योजनेपासून मतदार संघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीशी १ एप्रिल पासून तात्काळ संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभघ्यावा.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण २०१८ मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले, प्रक्रियेद्वारे अपात्र ठरलेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांचे योजनेच्या या दुसऱ्या टप्प्यात नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
सर्वेक्षण मोबाईल अॅपमध्ये करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सर्वेक्षक यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभमिळविण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली असून येत्या १ एप्रिलपासून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु होणार आहे.
नियमात बसतील त्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना
नुकतेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ चे ट्रेनिंग झाले असून १ तारखेपासून जे नियमात बसतील त्यांची माहिती गोळा करण्याचा सूचना आल्या आहेत. यामध्ये महिला कुटुंब प्रमुख असणार असून त्या महिलेचे आधार कार्ड, बँक पासबुक, जॉब कार्ड, सातबारा /उतारा, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, पीएम किसान कार्ड, ही कागदपत्रे लागणार आहेत.
तर तीन चाकी चार चाकी वाहन असणारे, कुटुंबात सरकारी कर्मचारी असेल तर, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असणारे, दरमहा पंधरा हजार रुपये कुटुंबातील सदस्य कमवत असेल तर, आयकर भरणारे, व्यावसायिक कर भरणारे, अडीच एकर पेक्षा जास्त बागायत जमीन असणारी,
पाच एकर पेक्षा जास्त जिरायत जमीन असणारी कुटुंबे या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत. – योगेश कदम, गटविकास अधिकारी, मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज