टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीनच खरबुज सौदे लिलावाचे उद्धघाटन बाजार समितीचे संचालक मोहन कौंडुभैरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
शेतकरी वर्गाने पाउस चांगला झाला असलेने फळ लागवडीकडे भर दिला आहे. बाजार समितीमध्ये खरबुज सौदे लिलाव सुरु करावेत अशी मागणी शेतकरी व व्यापारी यांचेकडुन वारंवार होत असलेने संचालक मंडळाने सौदे लिलाव सुरु करणेचा निर्णय घेतला.
यावेळी सभापती सोमनाथ आवताडे यांच्याहस्ते खरबुज उत्पादक शेतकरी निखील पापरीकर (तळसंगी) सचिन औताडे (गणेशवाडी) खरेदी व्यापारी शेखर शिंदे आकाश गुजर राहुल येलपले यांचा सत्कार करणेत आला.
सदरच्या कार्यक्रमासाठी सचिव सचिन देशमुख मकसुद बागवान सागर जाधव मारुती काळे बाळासाहेब माळी धनंजय पाटील संतोष पवार पिंटु पाटील नवनाथ बनसोडे बबन लंबे यांच्यासह शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
खरबुज सौदे लिलाव प्रत्येक आठवड्यातील दर सोमवार बुधवार व शुक्रवार यादिवशी दुपारी ४ वाजता होणार असलेची माहिती यावेळी सभापती सोमनाथ आवताडे यांचेकडून सांगणेत आली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज