टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम आटोपली. सरपंचपदाचे आरक्षणदेखील जाहीर झाले असून, आता आज दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून सरपंच, उपसरपंचपदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड केली जाईल.मुदत संपलेल्या तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले.
आज होणाऱ्या सरपंच, उपसरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत मोठी उत्सुकता असून त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी आरक्षणे पडली असून, त्या-त्या नुसार या निवडी होणार आहेत.
23 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदांसाठीच्या निवडणुकीकरिता विशेष सभा घेतली जाणार आहे. यात नवे सरपंच व उपसरपंच निवडले जाणार आहे. त्यामुळे गावोगावी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
असा असेल कार्यक्रम
सकाळी 10 वाजता सुरवात. सकाळी 10 ते 2 नामनिर्देशन दाखल करणे,त्यानंतर छाननी करून 10 मिनिटं नामनिर्देशन माघार घेण्यासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडी जाहीर होतील.
मंगळवेढा तालुक्यातील लक्षवेधक झालेल्या बोरोळे, नंदेश्वर ,सिद्धापूर महिला राखीव तर भोसे ओबीसी, सलगर बु., हुलजंती सर्वसाधारणसाठी राहिले.
असे पडले आहे आरक्षण..
सर्वसाधारण महिला : लमाणतांडा, मल्लेवाडी, माचणूर, कचरेवाडी, नंदेश्वर, रेवेवाडी, गुंजेगाव, उचेठाण, ढवळस, रड्डे, सलगर खु, लवंगी, माळेवाडी, हिवरगाव, ब्रह्मपुरी, सोड्डी, फटेवाडी, अकोला.
सर्वसाधारण : आसबेवाडी, मरवडे, लेंडवे चिंचाळे, तांडोर, मुढवी, महमदाबाद शे., डोणज, अरळी, कर्जाळ- कात्राळ, हुलजंती, सलगर बु, पाठखळ – मेटकरवाडी, खडकी, भाळवणी, आंधळगाव, देगाव, मानेवाडी, मारोळी, लोणार, हुन्नूर, जंगलगी, शिवनगी, मारापूर, जुनोनी.
अनुसूचित जाती स्त्री : बठाण, घरनिकी, चिक्कलगी, तामदर्डी, हाजापूर
अनुसूचित जाती पुरुष : कागष्ट, डिकसळ, शिरसी, मुंढेवाढी, गणेशवाडी
ओबीसी पुरुष : चोखोमेळा नगर, दामाजी नगर, बावची, निंबोणी, भालेवाडी, येड्राव, येळगी, रहाटेवाडी, लक्ष्मी दहीवडी, शेलेवाडी
ओबीसी स्त्री : खवे, खोमनाळ, खुपसंगी, पौट, पडोळकरवाडी, जालीहाळ – सिद्धनकेरी, डोंगरगाव, धर्मगाव, गोणेवाडी, भोसे, नंदूर
तर बोराळे, महमदाबाद हु, सिद्धापूर, शिरनांदगी, तळसंगी, जित्ती या गावांचे आरक्षण चिठ्ठीवर निश्चित करण्यात आले.
मात्र आरक्षण पडल्यानंतर त्याच संवर्गातील दोन सदस्य एकाच गटात असल्यास सरपंचपद कोणाला द्यायचे, हा वाद निर्माण होणार असून, पॅनेल प्रमुख व नेत्यांना याची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.
त्यामुळे आज होणार्या निवडीत कोणाकोणाच्या गळ्यात सरपंच व उपसरपंचचाची माळ पडते याकडे लक्ष लागले आहे.
‘हे’ अधिकारी करणार निवड प्रक्रिया…
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज