मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
उमदीजवळ डोळ्यांत ‘स्प्रे’ मारून पावणेतेरा लाख रुपये लुटल्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा उमदी पोलिसांनी १६ तासांत पर्दाफाश केला. प्रमोद सुभाष शिंदे (वय ३२, रा. चौगुले वस्ती, खडकी, ता. मंगळवेढा),
सिद्धेश्वर अशोक डांगे (२७, रा. खडतरे गल्ली, सांगोला), तौफिक समशेर मणेरी (३५, रा. मणेरी मळा, सांगोला) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ७६ हजार रोकड जप्त केली. आणखी एक संशयित अक्षय इंगोले (रा. सांगोला) हा पसार आहे.
मंगळवेढा परिसरातील व्यापारी फारूख शेख यांनी जांभूळ खरेदीसाठी प्रमोद शिंदे याला पावणेतेरा लाखांची रोकड देऊन दि. २ रोजी आंध्र प्रदेशला पाठविले होते.
शिंदे याला एवढी मोठी रोकड पाहून हाव सुटली. त्याने मित्र सिद्धेश्वर डांगे ऊर्फ दादा दांडगे, तौफिक मणेरी, अक्षय इंगोले यांना एकत्र करून चोरीचा बनाव करण्याचे ठरविले. त्यानंतर ही रक्कम आपापसांत वाटून घेण्याचे कारस्थान रचले.
कारस्थानानुसार मंगळवेढा ते ताडपत्री (आंध्र प्रदेश) या मार्गावर उमदीपासून पुढे आरटीओ चेकपोस्टजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास प्रमोद शिंदे याला उलटी आल्याचे भासविले.
गाडी थांबविल्यानंतर मोटारीतून आलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादी अभिजित वाडकर याच्या डोळ्यांवर स्प्रे मारला. तर इतर दोघांनी प्रमोद शिंदे याला मारहाण केली.
त्यानंतर गाडीत असलेल्या सॅकमधील १२ लाख ७६ हजार ८०० रुपये रोकड लंपास केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या वाडकर याने उमदी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज