टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील छत्रपती परिवारातर्फे आयोजित मरवडे फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १७ मार्चपासून कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोभायात्रेत शेकडो कलावंत सहभागी होणार असल्याने यंदा ही शोभायात्रा मरवडे फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरणार आहे.
दरवर्षी साहित्यिक व कलावंतांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मरवडे फेस्टिव्हलचा आरंभकलावंत व लोककलावंतांच्या गौरवार्थ भव्य शोभायात्रेने १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.
महाराष्ट्रातील पारंपरिक कलाप्रकार, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये बँड पथक, सूरसनई ताफा, हलगीपथक, नाशिक ढोल या वाद्यांसह लेझीम, गजीढोल व झांजचा गजर ऐकावयास मिळणार आहे.
याशिवाय लोककला जतन करण्यामध्ये अनमोल योगदान देणारे शाहिरी पथक, वासुदेव, वारकरी दिंडी, पिंगळा, पोतराज, मरिआईचा गाडा, बहुरूपी, गोंधळी, धनगरी ओव्या, सोंगी भारुड, भेदिक गाणी, बंजारा तसेच राजस्थानी नृत्य प्रकार आदींचा समावेश शोभायात्रेत असणार आहे.
याशिवाय ऐतिहासिक शिवकालीन पेहरावातील तसेच पारंपरिक वेशभूषेतील शेकडो आबालवृद्ध सहभागी होणार आहेत. यावेळी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार असल्याने पारंपरिक शोभायात्रेतील संस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी हजारो रसिकांना मिळणार आहे.
या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७०५७४७५६१०, ९४२१०६७१०७, ९७६४५२५२८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले.
कलावंतांना कला सादरीकरणाची संधी
मरवडे फेस्टिव्हलमध्ये कवी संमेलने, नाटके, एकांकिका, एकपात्री प्रयोग, रेकॉर्ड डान्स, संगीत मैफल, लोककला महोत्सव, जादूचे प्रयोग, हिप्नॉटिझम, कथा महोत्सव, हास्य दरबार, सप्त खंजिरी वादनाद्वारे प्रबोधनाचे कार्यक्रम,
शाहिरी, गोंधळ गीत, लोकगीतांचे पारंपरिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारच्या कलावंतांना कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. – सुरेश पवार, अध्यक्ष, छत्रपती परिवार.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज