मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पोलिसांनी तांत्रिक आधारे सराईत विश्लेषणाच्या चोरट्यासह महिलेला ताब्यात घेतले. आरोपीकडून एका दुचाकीसह ३ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सुनील मारुती मंडले (रा. पिपरी खुर्द), शुभांगी रामचंद्र बुधावले (रा. निंबवडे, ता. आटपाडी) या दोघांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील शामराव गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांची दुचाकी मिरज रोड माऊली हॉटेल येथून चोरीला गेल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
याप्रकरणी सुनील मारुती मंडले (रा. पिंपरी खुर्द, ता. आटपाडी, सध्या रा. देवापूर, ता. माण, जि., सातारा) याचे नाव निष्पन्न करून त्याच्याकडून दुचाकी ताब्यात घेतली.
त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी सुनंदा लक्ष्मण गोडसे (रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) या महिलेस चारचाकी गाडीतून लक्ष्मीनगर येथे सोडतो, असे म्हणून वाटेतच दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण व बोरमाळ काढून घेतली होती. हा गुन्हा दोघा आरोपींनी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ८ ग्रॅम सोन्याच्या गठंणसह ७ ग्रॅम सोन्याची बोरमाळ जप्त केली. आरोपींनी सांगोला-वासूद रोड येथील विनय कल्याण कांबळे यांचे नरेंद्र नगर येथील
बंद घराचे कुलूप, कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम तसेच ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स जोड, ७ग्रॅम लहान मुलाचा कंबरेचा करदोडा चोरी केल्याची कबुली देत सोन्याचे दागिने काढून दिल्याचे यावेळी खणदाळे यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाबासाहेब पाटील, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांच्यासह सायबरचे पोलिस हेड कॉन्स्टेबल युसूफ पठाण यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज