मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे दि. ८ व ९ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात चार सभा, बैठका आणि समाजबांधवांशी संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुणबी दाखले मिळण्याच्या प्रक्रियेत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचा दौरा होत आहे. जिल्ह्यातील दौऱ्याची सुरुवात शनिवार, ८ ऑगस्ट रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथून सकाळी १० वाजता इशारा सभेने होणार आहे. त्यानंतरची सभा माढा येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

पंढरपूर येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. तर रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे समाजबांधवांची बैठक होणार असून,

त्यानंतर सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सायंकाळी ४ वाजता जरांगे-पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला राजन जाधव, शिवाजी चापले, सचिन तिखटे, सचिन गुंड, अमोल भोसले आदी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














