टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील झेप परिवाराच्या वतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंगळवेढा येथे आज सोमवार दि.३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता
झेप सन्मान सोहळा रंगणार असून यावेळी स्व.लालसिंग रजपूत पुरस्कार व्यक्ती नव्हे चळवळ पुरस्कार डॉ.आप्पासो पुजारी यांना
तसेच तालुक्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मंगळवेढा येथील श्री.संत महाविद्यालयातील होणाऱ्या दामाजी सभागृहात झेप या सोहळ्याचे सन्मान अध्यक्षस्थान रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे भूषविणार असून
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम रंगणार आहे.
यावेळी दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी. पवार, बालाजी शिक्षण मंडळाचे उत्तमसिंग रजपूत , रजपूत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘हे’ ठरले पुरस्काराचे मानकरी
झेप सन्मान सोहळ्यात मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची सह.पतसंस्था , मंगळवेढा, श्री बाळकृष्ण विद्यालय , नंदेश्वर , डॉ.आप्पासो पाटील , विलास ज्ञानोबा आवताडे, सुनील शंकर नष्टे,
दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर दगडू भगरे, शिला सचिन शिवशरण , युवराज अशोक पाटील, धनाजी शिवाजी जाधव, ज्योती सचिन कलुबर्मे, मलकू महिबूब शेख यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, शाल, गुलाबपुष्प, पुस्तक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज