टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी सरकारी जमीन वर्ग करण्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
त्यामुळे या कामाला आता गती मिळणारच, अशी खात्री स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी व्यक्त केली आहे.
जगातील पहिली लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंटपाची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढा येथे ३१ वर्षे राहून केली.
यामुळे मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी शासकीय जमीन हस्तांतरित करून शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी ही लिंगायत समाजाची मागणी आहे.
जमीन मिळताच निधीही देणार
या प्रक्रियेला प्रशासकीय विलंब लागल्यास अथवा तांत्रिक अडचण असल्यास कृष्ण तलावाची सरकारी जमीनच स्वतंत्रपणे महात्मा बसवेश्वर स्मारक निर्मितीसाठी वर्ग करू.
जागा मिळताच गरजेनुसार १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करेन असा विश्वास अजित पवार यांनी दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज