टीम मंगळवेढा टाईम्स।
मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांच्या संवाद बैठक दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून निघणारेत. भूम येथील विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर त्यांचा दुपारी 1:30 वाजता भूम शहरात मराठा समाजासोबत त्यांची संवाद बैठक होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी वांगी, करमाळा या ठिकाणी उदयसिह देशमुख यांच्या विवाह समारंभाला जरांगे भेट देणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 मार्च 2024 सोमवार दुपारी 12:00 वाजता, वैराळा जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे.
दुपारी 3:00 वाजता मोहोळ, जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होईल. तर सायंकाळी 5:00 वाजता शेटफळ जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे. असा जरांगेंचा दोन दिवसीय दौरा असणार आहे.
दरम्यान, काल अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शपथ घेण्यात आली.
यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची सगेसोयरेबाबतच्या मागणी बाबत कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नाही. तसेच कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही, असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज