टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयातील खडी क्रशर सुरु करण्याबाबतचे निवेदन मंगळवेढा तालुका क्रशर असोसिएशनने अप्पर जिल्हाधिकारी व मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांना दिले आहे.
दि. २७ मंगळवेढा तालुक्यातील सर्व खडीक्रशर जिल्हाधिकारी यांचे तोंडी आदेशावरून बंद करण्यात आली आहेत.
गेली १४ दिवसापासून खडी क्रशर व्यवसाय बंद असले कारणाने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होवून उपासमारीची वेळ आली आहे.
खडी क्रशर बंद असलेने मंगळवेढा तालुक्यातील सर्व बांधकामे बंद असून मजुरांचे काम बंद झालेले आहे. त्यामुळे त्यांचेवरही उपासमारीची वेळ आली आहे.
वास्तविक पाहता आमचेकडे प्रदूषण महामंडळ सोलापूर, आधार उदयोग इ. परवानगी आहे. तसेच आम्ही वेळोवेळी शासनाकडे स्वामित्वधन रक्कम जमा केली शिवाजी जाधव, आहे. तरीही खडी क्रशर बंद केली आहेत. अजून आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची आमची तयारी असून सदर निवेदन आपल्या स्तरावरून
शासनास अवगत करून खडी क्रशर सुरु करण्यास परवानगी मिळावी असे त्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर रमेश भांजे, लक्ष्मण मस्के, विश्वनाथ गाडवे, चेतन गाडवे, रोहिणी पवार, सुनिल थोरवत, संगमेश हिरोळी,विक्रम गाडवे, बापू बंडगर, शिवाजी पडवळे, नामदेव जाधव, गौडाप्पा बिराजदार आदींच्या सह्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज