टीम मंगळवेढा टाईम्स।
महाविकास आघाडी सरकारने नेमलेली सोलापूर जिल्हा नियोजन समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेवर येताच बरखास्त केली होती.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपकडून आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते पाटील यांना, तर शिंदे गटातील माजी आमदार नारायण पाटील, शिवाजी सावंत, अमोल शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सरकारने सोलापूर जिल्हा नियोजन समिती नव्याने गठीत केली आहे. या समितीत भाजप आणि शिंदे गटाच्या नेते असलेल्या २० सदस्यांच्या समावेश आहे.
नव्या समितीमुळे नियोजन समितीच्या निधी खर्चास आता गती येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज उपसचिव संजीव धुरी यांच्या सहीने पारित करण्यात आला आहे.
या समितीत पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यातून माजी सभापती प्रदीप खांडेकर यांना संधी देण्यात आली. माजी सभापती प्रदीप खांडेकर हे समाधान आवताडे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
यापूर्वी त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून कारभार पाहिला आहे. त्यांना या कामाचे बक्षीस शिंदे-फडणवीस सरकारकडून मिळाले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या बरखास्तीनंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला सहा महिन्यानंतर नियोजन समितीच्या सदस्य निवडीस मुहूर्त मिळाला. नवीन सदस्यांमध्ये विधानमंडळ सदस्यांमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.
विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (ब्रदर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला शिंदे गट), गणेश चिवटे (करमाळा शिंदे गट), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर),
प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी शिंदे-फडणवीस सरकारसाठी या निवडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज