मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यात लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थ विक्रेत्यांवर आता थेट अंगावर येणारी कारवाई सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेताच अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या धडाकेबाज निर्णयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

या कारवाईचा थेट परिणाम आता मंगळवेढ्यात पाहायला मिळत आहे. आयुक्त मुंढे यांच्या कडक प्रशासनाचा धसका स्थानिक स्वीट मार्ट चालकांनी घेतला आहे.

दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या मलाई, पेढा आणि पनीर यांमध्ये होणारी संभाव्य भेसळ उघडकीस येऊ नये, म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी हे पदार्थ काउंटरवरून रातोरात गायब केले आहेत.

आरोग्याचा प्रश्न आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? गेल्या काही काळापासून भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.

स्थानिक पातळीवर काही अधिकारी केवळ ‘लक्ष्मी दर्शन’ (लाच) घेऊन याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती.

मात्र, आता वरिष्ठ पातळीवरूनच थेट कारवाईचे आदेश सुटल्याने भ्रष्ट अधिकारी आणि भेसळखोर व्यापारी दोघांचेही धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच मंगळवेढ्यातून मलाई, पेढा आणि पनीर रातोरात गायब झाले. यावरून एकच भीषण वास्तव समोर येतंय—आतापर्यंत मंगळवेढ्यातील लहान मुले आणि नागरिक जे खात होते,

त्यात शुद्धतेचा अंश तरी होता की ते निव्वळ भेसळीचे विष होते? ‘लक्ष्मी दर्शन’ घेऊन गप्प बसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच जनतेच्या आरोग्याचा खेळखंडोबा झालाय का? असा संतप्त सवाल जनता विचार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










