टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सध्या प्रशासकीय बदल्यांचे वारे वाहत असून, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या अंतर्गत मंगळवेढा पोलीस ठाण्यात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ५ अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी बाहेरून ५ नवीन पोलीस कर्मचारी मंगळवेढ्यात रुजू झाले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मंगळवेढ्यातून इतरत्र बदली झालेले पोलीस कर्मचारी:
मंगळवेढा पोलीस स्टेशनमधून खालील कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे:

तुकाराम कोळी (पोलीस हवालदार) पंढरपूर
श्रीमंत पवार (पोलीस हवालदार) पोलीस मुख्यालय
दौलतराव तलवार \ सांगोला
कृष्णा जाधव (पोलीस नाईक) पोलीस मुख्यालय
कविता मिसाळ (महिला पोलीस अंमलदार) पंढरपूर

बाहेरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात आलेले नवीन कर्मचारी:
मंगळवेढ्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी खालील ५ कर्मचारी नव्याने दाखल झाले आहेत:

सिध्देश्वर माळी (सहाय्यक फौजदार)
परशुराम शिंदे (पोलीस हवालदार)
महेश पवार (पोलीस नाईक)
सागर देसाई (पोलीस अंमलदार)
शिवाजी खटकळे (पोलीस अंमलदार)

यांना मिळाली १ वर्षाची मुदतवाढ:
काही कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेत किंवा प्रशासकीय गरजेनुसार त्यांना आहे त्याच ठिकाणी पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे:

प्रविण सावंत (पोलीस अंमलदार) – १ वर्ष मुदतवाढ
राजेश पवार (पोलीस उपनिरीक्षक) – १ वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










