टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-गणेशवाडी मार्गावरील माणगंगा पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगातील एमएच ०९ एफबी २३७५ या कारने, दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गणेशवाडी येथील शेतकरी महादेव शिंदे (वय- ५५) यांचा मृत्यू झाला. मयताचे पुतणे अजित कांतीलाल शिंदे (रा. गणेशवाडी) यांनी

मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कारचा चालक नितीन मुळे (रा. इचलकरंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, महादेव शिंदे हे गणेशवाडी येथील खुल्या शेताकडे दुचाकीवरून जात होते.

पेट्रोलपंपाजवळील डिव्हायडरमधून यू-टर्न घेऊन गणेशवाडीच्या दिशेने वळत असताना कोल्हापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. विशाल गायकवाड, नितीन शिंदे, आदिनाथ गायकवाड,

साबीर शेख, सागर तानगावडे व संजय आवताडे यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









