टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुद्रांक शुल्क कार्यालयात जागेची किंवा जमिनीच्या खरेदीवेळी आता खरेदी घेणारा व खरेदी देणाऱ्याचा आधारलिंक अंगठ्याचे ठसे जुळणे बंधनकारक आहे. याशिवाय त्या मालमत्तेसंबंधीची सर्व कागदपत्रे असायलाच हवीत, असा नियम आहे.
मात्र, अजूनही बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रांद्वारे जागा- जमीन बळकावल्याच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत, हे विशेष.
सोलापूर शहरातील अनेकांनी लाखो रुपये मोजून हद्दवाढ भागात स्वत:ची जागा घेतली, पण त्याची खरेदी त्यांच्या नावावर झाली नाही. १०० ते ५०० रुपयांचा बॉण्ड अथवा तीन-सहा महिन्याच्या मुदतीची नोटरी करून ती जागा घेतली आहे.
लाखो रुपये देऊनही त्यांना त्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळालेला नाही. एकच जागा मूळ मालकाने एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकल्याचीही उदाहरणे आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी-विक्रीवरील निर्बंध हे आहे.
दुसरीकडे जागांच्या किंमती वाढल्याने बनावट कागदपत्रे तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून जागा बळकावण्याचेही प्रकार होत आहेत. एकाच सातबारावर एकापेक्षा अधिक जणांचा हिस्सा व नावे असतानाही त्यातील एकजण परस्पर स्वत:चा हिस्सा विकून उर्वरित जागेवर पुन्हा नावे नोंद करत असल्याचीही उदाहरणे आहेत.
दरम्यान, सुखी संसारात रमलेल्या सामान्य व्यक्तींची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, कोणीही मालमत्तेची बनावट खरेदी-विक्री करू नये, म्हणून ठोस उपाय जरूरी असल्याची मागणी अनेकांची आहे.
खरेदी-विक्रीवेळी घेणारा अन् देणाऱ्याचा आधारलिंक अंगठा घेतला जातो
खुल्या जागेची खरेदी-विक्री करण्यासाठी त्या मालमत्तेचा सातबारा किंवा प्रापर्टी कार्ड, मोजणी नकाशा किंवा ले-आऊट, एनएन (अकृषिक) आदेश, गुंठेवारीचा झोन नकाशा जरूरी आहे. याशिवाय खरेदी देणारा व खरेदी घेणाऱ्या व्यक्तीचा ऑनलाइन आधारलिंक अंगठा देखील घेतला जातो. कोणाचीही फसवणूक होवू नये, म्हणून आता सर्व्हरला अडथळा असल्यास दस्त न करण्याच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत. – प्रकाश खोमणे, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर
…तर थेट खरेदीदस्तच रद्द करण्याचा अधिकार
बनावट दस्त करून एखाद्याच्या जागेवर किंवा जमिनीवर कोणी नावे नोंदवली असतील अथवा एका सातबारावर अनेकांची नावे असतानाही एक-दोघांनीच ती मालमत्ता विकली असल्यास अन्यायग्रस्तांना आमच्याकडे (प्रातांधिकारी कार्यालय) अपिल दाखल करता येते.
ती नोंद किंवा खरेदीदस्त रद्द करण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. याशिवाय एखाद्याला फसवणूक मालमत्ता खरेदी केली असल्यास अशावेळी संबंधितांना दिवाणी न्यायालयात दाद मागता येते.- सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी, सोलापूर
फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ बाबी लक्षात ठेवा…
मूळ मालकांनी आपल्या जागा-जमिनीचा सातबारा किमान १५ ते ३० दिवसांतून एकदातरी ऑनलाइन पाहावा
आपल्या मालमत्तेचा सर्च रिपोर्ट एक-दोन महिन्यातून एकदा काढावा; तो मोफत व शुल्क भरूनही मिळतो
फसवणूक झाल्यानंतर एजंटांच्या नादी न लागता थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागावी
‘नोटरी’ची मुदत संपण्यापूर्वी त्याची मुदत वाढवून घ्यावी आणि वेळेत त्या जागेची खरेदी करून घ्यावी.(स्रोत:सकाळ)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज