मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची २०२१ ला पोटनिवडणूक झाली होती. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी एकमेकांना सहकार्य केले होते.
परंतु त्यांच्याकडून मतदारसंघात एकमेकांकडून कामे करू दिले नसल्याचे आरोप होत आहेत. परिचारक व आवताडे यांचा बिनपैशाचा तमाशा सुरू असून यांच्यामुळेच पंढरपूरच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.
धोत्रे म्हणाले, पंढरपूर येथे चंद्रभागा नदी, रेल्वे स्टेशन व इतर बाबींची मुबलकता होती. परंतु प्रशांत परिचारक व आ. आवताडे यांच्याकडून पंढरपुरात एमआयडीसी मंजूर करून घेण्यासाठी मानसिकता दिसून येत नव्हती.
गतवर्षीच एमआयडीसी मंजूर होऊन येथील युवकांना रोजगाराची उपलब्धतता झाली असती, परंतु येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एमआयडीसीला विरोध दर्शविला होता.
परंतु परिचारक व आ. आवताडे यांच्याकडून विरोध करणाऱ्या भाजपच्या लोकांवर कारवाई करण्यात आली नाही.
विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे पंढरपूरसाठी काहीच योगदान नाही. पंढरपुरात येताना सिद्धेवाडी याच्यापुढे यायचे असेल तर त्यांना लायसेन्स घेऊन पंढरपूरकडे यावे लागत होते.
आमदार आवताडे हे निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडले आहेत. त्यांना जनता थारा देणार नाही. निधी आणला परंतु बोगस कामे करून तो मातीत घालण्याचे काम यांच्याकडून झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गोरगरीब लोकांनी कर्जे काढून घर मिळेल या आशेने पैसे भरले होते.
प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद पडले आहे. ठेकेदाराने काम पूर्ण केले नसून तो पळून गेला आहे. तसेच दुरुस्तीसाठी टेंडर निघाले होते परंतु काम घेण्यासाठी ठेकेदारसुध्दा यायला तयार नाहीत. आमदार आवताडे यांनी फक्त कागदावर निधी आणला आहे.
मात्र प्रत्यक्षात काम झाल्याचे दिसून येत नाही. पंढरपूरचा गेल्या २५ वर्षांपासून विकास झालेला नाही. पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून तत्काळ उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.
गतवर्षी गणेशोत्सव सणाच्या काळात लोकांना पाण्याची टंचाई भासत होते. टँकरच्या सहाय्याने पाणी उपलब्ध करून देण्यात आले. एमआयडीसी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
दरम्यान, युवकांना रोजगाराची उपलब्धता युवकांना रोजगाराची उपलब्धतता करून देण्याचे काम पुढील काळात करायचे आहे. मनसेच्या माध्यमातून शहर व तालुक्यात कामे करण्यात आली आहेत.
एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून पंढरपुरातून इतर शहरात होणारे स्थलांतर थांबवायचे असल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज