टीम मंगळवेढा टाईम्स ।
अठरा गुन्ह्यात ‘वॉन्टेड’ असलेल्या व गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
तपासादरम्यान त्याने मंगळवेढ्यातील आवताडे शुगर फॅक्टरीमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले. विकलेला माल भंगार व्यावसायिकाकडून हस्तगत करण्यात आला असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील बालाजीनगरात असलेल्या आवताडे फॅक्टरीच्या आवारातील स्टोअर रूमच्या खिडकीचे गज तोडून, अज्ञात चोरट्यांनी १३ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० च्या दरम्यान ५ लाख ९४ हजार ७२० रुपयांचे साहित्य चोरीला नेल्याची फिर्याद सुरक्षा अधिकारी चंद्रकांत नारायण राठोड (वय ४८) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली होती.
रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ येथे गेले होते. तेथे फौजदार ख्वाजा मुजावर यांना गोपनीय माहिती मिळाली.
बातमीदाराने त्यांना आवताडे शुगर फॅक्टरीची चोरी सूरज ऊर्फ डम्या रवी चव्हाण याने साथीदाराच्या मदतीने केल्याचे सांगितले. पथकाने सौंदणकट येथे त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याने साथीदारासमवेत चोरी केल्याचे सांगितले.
भंगार व्यावसायिक जावेद शेख याला ताब्यात घेऊन, चोरीला गेलेले पाच लाख ९४ हजार ७२० रुपयांचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेले तीन लाखांची वाहने जप्त केली.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
दोघांना मंगळवेढा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने पार पाडली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज