टीम मंगळवेढा टाईम्स ।
अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे
यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती.
मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले होते. मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले होते.
मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली
यानंतर आता आठव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे आंदोलक महिलांकडून पाणी घेण्याची आणि उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी महिला आंदोलक रडताना दिसून आल्या. आता मनोज जरांगे पाटील उपचार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगेंना केला होता डॉक्टरांवर आरोप
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक आलं होतं. यावेळी जरांगेंनी डॉक्टरांना चांगेलच झापले होते. माझं शुगर उपोषणाला बसताना 71 होतं मग शुगर 85 कसं झालं, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला होता. तुम्ही फडणवीसांना मॅनेज झाल्याचा आरोप जरांगे यांनी डॉक्टरांवर केला होता.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या?
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
हैदराबाद गॅझेट लागू करावे.
सातारा गॅझेट लागू करावे.
बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज