टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच प्रकल्पात आता भू-आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होईल.
परिणामी, जमिनीची विक्री करताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून पडताळणी केल्याशिवाय विक्री करता येणार नाही.
यातून शेतकऱ्याच्या अनुपस्थितीत किंवा फसवणूक करून जमिनीची विक्री करता येणार नाही. परस्पर विक्रीचे प्रकार यामुळे टळणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आला आहे.
लवकरच होणार अंमलबजावणी
जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये होणारे गोंधळ, वादविवाद टाळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर पाच ते सहा गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. डिसेंबरपासून सबंध राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. – सरिता नरके, नोडल ऑफिसर, अॅग्रिस्टॅक प्रकल्प
राज्यात येत्या डिसेंबरपासून ‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनीला त्यांचा आधार क्रमांक आणि भू आधार क्रमांक जोडला जाणार आहे. केवळ शेतकऱ्याचाच नव्हे, तर सर्व संबंधित खातेदारांचाही आधार क्रमांक यात जोडला जाणार आहे. त्यात कृषक, अकृषक जमिनींचाही समावेश करण्यात आला आहे.
याबाबतचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने सरकारकडे दिला असून, त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. परिणामी जमीन विकताना संबंधित जमीन मालकाकडून त्याच्या वैयक्तिक आधार आणि भू- आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी अयशस्वी झाल्यास त्या जमिनीची विक्री अन्य कोणालाही करता येणार नाही.
भूमी अभिलेख विभाग आखणार विशेष मोहिमा
शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकासह भू आधार क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयएआयडी) जमा केला जाणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून विशेष मोहिमादेखील आखल्या जाणार आहेत.
एका स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करून त्यावर शेतकरी आपली माहिती भरून तलाठ्याकडे देऊ शकतील. शेतकऱ्याला तलाठ्याची भेट घेऊन जमिनीबाबत पडताळणी करावी लागेल. तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पडताळणी करून आधार क्रमांक जोडण्याची खात्री करणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज