टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा व ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज दि.22 जुन रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सरपंच वैष्णवी विजय माने यांनी दिले आहे.
आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न होणार असून तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी योगेश कदम हे असणार आहेत.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, दामाजी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सूर्यकांत ठेंगील, जिल्हा दूध संघ संचालक तानाजी काकडे, समाज कल्याण माजी सभापती शीलाताई शिवशरण,
माजी सभापती सुधाकर मासाळ, पंचायत समिती माजी सदस्य शिवाजी पटाप, उपसभापती रमेश भांजे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक पप्पू काकेकर, लेबर फेडरेशनचे संचालक सरोज काझी व दामाजी कारखान्याचे संचालक अशोक केदार यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी 186 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आमदार समाधान आवताडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे तर दामाजी कारखान्याचे माजी संचालक विजय माने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कात्राळ कर्जाळ गावाला मिळालेला निधी
नंदुर कात्राळ रस्ता करण्यासाठी 4 कोटी 26 लाख निधी मंजूर, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यासाठी 16 लाख निधी, जल जीवन मिशन कामासाठी 99 लाख, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र करण्यासाठी 55 लाख मंजूर,
हनुमान मंदिरासमोर जागेत सभा मंडप बांधण्यासाठी 7 लाख मंजूर, व्यायाम शाळा 10 लाख मंजूर, दलित वस्ती येथे स्ट्रीट लाईट व पेविंग ब्लॉक बसविण्यासाठी 15 लाख निधी मंजूर,
अल्पसंख्यांक बहुल अंतर्गत मशीद येथे पेविंग ब्लॉक व पाणीपुरवठा सुविधा 15 लाखाचा निधी, कर्जाळ ते गैबीपीर रस्ता दुरुस्तीसाठी 11 लाखाचा निधी गावाला मिळाला असल्याची माहिती विजय माने यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज