पंढरपूर : राजेंद्र फुगारे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा व गोंदवले महाराज मठ या रस्त्याचे भूमिपूजन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमासप्रसंगी बोलताना सभापती आवताडे यांनी सांगितले की, पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आणि प्रगतीचा ध्यास घेतलेले लोकनायक म्हणून आमदार महोदय यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे.
मतदार संघातील मूलभूत आणि पायाभूत बाबींचा धोरणात्मक विकास करण्यासाठी आमदार समाधान दादा आवताडे हे कोणताही राजकीय आकस डोळ्यासमोर न ठेवता सर्व समावेशक निधीची तरतूद करण्यासाठी नेहमीच आग्रही असतात.
गाव पातळीवर राजकीय अथवा गट तट यांचा झेंडा बाजूला ठेवून गावाचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि एकविचाराने आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कास सुधारली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या रस्ते वीज पाणी शैक्षणिक सुख सोयी आरोग्य आदी बाबीसाठी भरगोस असा निधी आणून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या विकास कामासाठी कुठेही कमी न पडता
काम करत असून आपणही कुठल्या कामासाठी मागणीला कमी न पडता आपण आपल्या मागण्या करा आमदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावाच्या विकासासाठी वचनबद्ध असो असे आवाहन यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक आवताडे यांनी केले.
या कामाचे भूमिपूजन सभापती यांच्या हस्ते तर जेष्ठ नेते दिलीप भाऊ गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सदर प्रसंगीसदर प्रसंगी सरपंच श्री. विलास मस्के, उपसरपंच उदय पवार, श्री महेश दादा चव्हाण, मा.उप.विक्रम आसबे, श्री. सचिन आसबे, श्री. पांडूरंग देवमारे,श्री.अरुण बनसोडे, श्री. आश्विन बुरले, श्री. अजय जाधव, श्री. राहुल माने,
श्री. ओंकार भोसले, श्री. योगेश रसाळ, श्री. संजय माळी, श्री. हनुमंत शिंदे, श्री. योगेश कांबळे, श्री. दत्ता घोडके, श्री. विजय भूकर, श्री. नागू तात्या बनसोडे, श्री. विष्णू बनसोडे, श्री. गोपाळ म्हेत्रे,
श्री. अमोल पाटील, श्री. आकाश चव्हाण, श्री. रवी केसकर, श्री. दत्ता पिसे,श्री. दिपक सुरावसे, श्री. रघुनाथ पवार, श्री. बबलू आसबे, श्री. मुकेश पंडित, श्री. महेश वावरे आधी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज