mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘कोरोना’त पालक गमावलेल्या मुलांना शासनाकडून मोफत शिक्षण; ‘या’ तारखेपर्यंत चालणार प्रवेश प्रक्रिया

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 13, 2023
in राज्य, शैक्षणिक, सोलापूर
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक बालकांना फायदा मिळणार आहे.

बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्केच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १७ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेतली जाणार नसल्याच्या सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोना काळात म्हणजे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रवेश प्रक्रियेंतर्गत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी जन्माचा दाखला, पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, निवासी पुरावा, रेशनकार्ड, वाहन परवाना, घरपट्टी पावती, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,

सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहेत.

अशी आहे वयोमर्यादा

बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२३ रोजीचे किमान वय ६ वर्षे किंवा कमाल वय ७ वर्षे ५ महिने ३० दिवस बालकांचे वय असणे अपेक्षित आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

एकही बालक वंचित राहू नये

बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा. अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी. आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.

आर्थिक वर्षात १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी १० शाळांची निवड करावी, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने १७ मार्चपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर सोडत काढण्यात येईल. पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाईल.

शिवाय कोरोनात पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

ADVERTISEMENT

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शाळा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

March 24, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
चिंता वाढली! सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक; ग्रामीणमध्ये संशयितांच्या चाचण्या अत्यल्प

चिंता वाढली! सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक; ग्रामीणमध्ये संशयितांच्या चाचण्या अत्यल्प

March 23, 2023
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

March 22, 2023
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्यात तिसरा बळी; तीस वर्षीय तरुणाचा ‘कोरोना’ने मृत्यू, मंगळवेढ्यात एकाला लागण; अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली…

March 22, 2023
Next Post
असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी उपलब्ध करून दिली; DYSP राजश्री पाटील यांचे प्रतिपादन

असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी उपलब्ध करून दिली; DYSP राजश्री पाटील यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..