टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सहकार भूषण म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. असे प्रा.शिवाजीराव काळुंगे हे तालुक्यातील सर्वसामान्याच्या सर्वांगीण विकासाचे खरे लोकनायक आहेत. असे प्रतिपादन मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी केले आहे.
धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७४ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि.७ मार्च रोजी सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस.ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजश्री पाटील बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भीमाशंकर बिराजदार हे होते. व्यासपीठावर प्रा. शिवाजीराव काळुंगे, भूलतज्ञ डॉ.राजेंद्र जाधव, धनश्री महिला पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे,
तहसीलदार विक्रमसिंह शिंदे, विठ्ठल शगुरचे संचालक समाधान काळे, दामाजी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ.शिवाजीराव पवार, ज्ञानदेव जावीर, युवराज गडदे, सतिश दत्तु, संजय चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजश्री पाटील पुढे बोलताना म्हणाल्या, कायमच्या दुष्काळी परिस्थितीतही आर्थिक क्षेत्रात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टिस्टेट या दोन्ही आर्थिक संस्था सक्षमपणे काम करीत आहेत.
त्याचबरोबर नुकताच धनश्री परिवारात नव्याने समाविष्ट झालेला खर्डीचा श्री सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना व या दोन्ही आर्थिक संस्था यांच्या माध्यमातून काळुंगे दाम्पत्याने अनेकांचे संसार उभे करण्यात यश आले आहे.
असंख्य बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीची संधी धनश्री परिवाराने उपलब्ध करून दिली. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्रीडा कला क्षेत्रातील अनेक विविध उपक्रमामध्ये धनश्री परिवाराचे योगदान राहिले आहे त्यामुळे धनश्री परिवाराचे नाव सर्वदूर पसरले आहे. याचे खरे श्रेय प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांना जाते.
डॉ.राजेंद्र जाधव म्हणाले साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु आहे. या आर्थिक केंद्रबिंदू जिवंत ठेवण्यासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांचे मोठे योगदान आहे.
खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नंदनवन व्हावे म्हणून खर्डीचा श्री सद्गुरू सिताराम महाराज साखर कारखाना हा चालविण्यासाठी हाती घेतला. त्याची जबाबदारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड यांच्यावर सोपवली.
त्यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्ववाच्या जोरावर अल्पवधीत सिताराम महाराज साखर कारखानाचे नाव जिल्हाभर उज्ज्वल केले. खरोखरच मंगळवेढेकर इतके भाग्यवान आहेत की, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शोभाताई काळुंगे व त्यांचा धनश्री परिवार यांचा सहवास या मंगळवेढातील लोकांना लाभला.
ही अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ. भीमाशंकर बिराजदार, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. माऊली जाधव यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, सांगोला तालुका सूतगिरणीचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, दत्तात्रय बागल,
यादाप्पा माळी, लयभरी उद्योग समूहाचे प्रमोद साळुंखे – पाटील, गौरीशंकर बुरकूल, दत्तात्रय पाटील, उमाकांत कनशेट्टी, रामचंद्र बंडगर, ईश्वर गडदे, प्रकाश काळुंगे, अंकुश पडवळे, पैलवान मारूती वाकडे, दिगंबर भगरे,
नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी, सोमन्ना सांगोलकर, लहू ढगे, सोमनाथ गुळमिरे, शशिकांत केदार, सागर मिसाळ, रंगनाथ काळुंगे, बाळकृष्ण काळुंगे, विठ्ठल काळुंगे, दत्तात्रय गायकवाड,
मारुती काळुंगे, उत्तम पाटील, अॅड.राहुल घुले, दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे, युवराज लुगडे, निंबोणीचे माजी सरपंच अर्जुन खांडेकर, सोमनाथ बुरजे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, कैलास मसरे,
धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, श्री सदगुरू सिताराम महाराज साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत पाटील, टेक्नीकल जनरल मॅनेजर सुर्यकांत पाटील,
उद्योजक गंगाराम खांडेकर, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, यांचेसह धनश्री महिला पतसंस्था, धनश्री मल्टिस्टेट व सदगुरू सिताराम महाराज अर्बन मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी व इतर राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार इंद्रजित घुले यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज