mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 15, 2020
in राज्य
वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज

सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत.

अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. तर काही ठिकाणी नंबर प्लेटसाठी मनमानी किंमती वसूल केल्या जात आहेत.

आतापर्यंत वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी एक आदेश जारी करत, विना HSRP वाल्या सर्व वाहनांना आरटीओमध्ये (RTO) होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामांवरही बंदी घालण्यात आली.

सध्या परिवहन विभागाने जुन्या वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आवश्यक असल्याचा आदेश मागे घेतला आहे.

काय आहे हाय सिक्योरिटी नंबर प्लेट?

हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) एक होलोग्राम स्टीकर आहे, ज्यावर वाहनाचा इंजिन आणि चेसिस नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहन सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता बनवण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो.

प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाला जोडलेली असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.

कसं कराल HSRP ऑनलाईन अर्ज –

हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल.

खाजगी व्हीकल टॅबवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, CNG आणि CNGपेट्रोल यापैकी पर्याय निवडावा लागेल. पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यानंतर वाहनांची कॅटेगरी खुली होईल. यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे पर्याय असतील. यात काही माहिती भरावी लागेल.

तसंच, गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.

कोणत्या वाहनावर कोणत्या रंगाचा स्टीकर

हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. डिझेल गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर लावणं अनिवार्य आहे. दूरवरूनच वाहनांची ओळख पटावी हा या मागचा हेतू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणं अनिवार्य केलं आहे. सुरुवातीला अनेक प्रयत्नांनंतरही याचा सकारात्मक परिणाम न झाल्याने, परिवहन विभागाने याबाबत सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे,

जेणेकरून वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. याला सुनिश्चित करण्यासाठी 15 डिसेंबरपासून अभियान चालवण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ चार चाकी वाहनांवरच सक्ती असणार आहे.(news18लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नंबर प्लेट

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

दामाजी कारखान्याच्या गव्हाणीत पाय घसरून पडलेल्या कामगाराचा चैनमध्ये अडकुन मृत्यू

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा