mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश नसला तरी बंदोबस्तासाठी शेकडोंच्या संख्येने पोलिस दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2020
in सोलापूर
वारकऱ्यांच्या लढ्याला यश! दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले

कार्तिकी दशमी आणि एकादशी (बुधवार व गुरुवार) पंढरपूर शहरात वारकऱ्यांना प्रवेश नसला तरी बंदोबस्तासाठी शेकडोंच्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत.

कार्तिकी एकादशी दिवशी गुरुवारी (ता. 26) पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

शासनाने राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केल्यानंतर गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून प्रवेश बंद असलेल्या येथील श्री विठ्ठल – रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येऊ लागले होते.

परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ऐन कार्तिकी यात्रेत पंढरपूर शहर आणि लगतच्या अकरा खेडेगावांमध्ये 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे 25, 26 आणि 27 या तीन दिवसांत मुखदर्शन देखील बंद राहणार आहे.यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी बंदोबस्तासाठी सुमारे 1700 पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.

दोन दिवस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर नाकाबंदी पाईंट कार्यरत करण्यात आले आहेत.

दरम्यान, गुरुवारी (ता. 26) पहाटे एक वाजता श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळात श्री रुक्‍मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होईल.

त्यानंतर श्री. पवार यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचा आणि मंदिर समितीच्या वतीने श्री. पवार यांचा सत्कार होईल.आषाढी यात्रेच्या वेळी एकादशीला भक्तांना प्रवेश नव्हता, त्यामुळे मंदिर समितीच्या सहा विणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून एकाची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे यंदा कार्तिकी एकादशी दिवशी मंदिरातील विणेकऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांच्यापैकी एकाला श्री विठ्ठल – रुक्‍मिणीच्या शासकीय महापूजेच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.

25 ते 27 नोव्हेंबर असे तीन दिवस भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. परंतु 28 तारखेपासून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या भाविकांना मंदिरात मुखदर्शनासाठी सोडले जाणार आहे.

लॉज चालकांना नोटिसा

25 आणि 26 असे दोन दिवस शहरात संचारबंदी असली तरी शहरातील मठांमधून आणि लॉजमधून आधी कोणी येऊन राहू नये यासाठी मठ आणि लॉज मालकांना मठ आणि लॉजमधून कोणालाही राहण्यास देऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत.

त्यामुळे यात्रा काळात ज्या लॉजमधून नेहमीपेक्षा दुपटीने, तिपटीने दर आकरणी करून रूम भाड्याने दिल्या जात असत, त्या रूम सध्या कुलूप लावून बंद ठेवण्याची वेळ लॉज मालकांवर आली आहे.

दि.25 आणि 26 रोजी एसटी वाहतूक सुरू राहणार असली तरी केवळ पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांनाच ओळखपत्र पाहून पंढरपूर शहरातील त्यांच्या घरी अथवा कामावर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.(source:सकाळ)

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कार्तिक वारीपंढरपूर

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

सोलापूर ब्रेकिंग! 'या' गावात एटीएम फोडून ११ लाखांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा