सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी शाखेचे माढा रस्त्यालगत असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून चोरट्याने 11 लाख 42 हजारांची रोकड लांबविली. 23 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नोंद कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
बँक ऑफ इंडियाच्या कुर्डूवाडी शाखेचे माढा रस्त्यालगत असलेले एटीएम हे फायनान्शियल सिस्टीम सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचे आहे. कंपनीचे एरिया मॅनेजर सचिन चौधरी हे या आहेत.
सोमवारी दुपारी सीएमएस कंपनीकडील कॅश लोड करणारे कर्मचारी आश्रम बेडकुते (रा. वरकुटे, ता. करमाळा), अनिल भाग्यवंत (रा.झरे, ता.करमाळा) यांनी 5 लाख रुपये एटीएममध्ये भरले होते.
दि.23 नोव्हेंबर रोजी रात्री 12 ते पहाटे 5 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी, मशिनच्या समोरील बाजूचे लॉक गॅसकटरच्या सहाय्याने कट केले. आतील 11 लाख 42 हजारांची रोकड अज्ञात लांबविली.24 नोव्हेंबर रोजी सकाळी एटीएमची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या
अरविंद जगताप (रा. कुर्डूवाडी) यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी बँक ऑफ इंडिया, कुर्डूवाडी शाखेचे शाखाप्रबंधक उदय काकपुरे यांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
चोरट्यांनी 2 हजाराच्या 6 नोटा, 500 रूपयाच्या 2,253 नोटा, 100 रूपयांच्या 35 नोटा चोरून नेल्या.एटीएम मशीनचेही 25 हजाराचे नुकसान झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज