टीम मंगळवेढा टाइम्स । गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल. HSC exam result date announced
बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
www.mangalwedhatimes.in
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.
दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. आता मात्र बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज