टीम मंगळवेढा टाईम्स ।
हेगडे कुटुंबाला न्याय मिळवून देवून दोषींवर कठोर कारवाई होण्यास भाग पाडू,शासकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी हेगडे कुटुंबास धीर देताना सांगितले.
याप्रसंगी सचिन शिवशरण, अशोक केदार, सरपंच दामू कांबळे, उपसरपंच परमेशर येनपे,चिमाजी हेगडे, भीमा हेगडे, हरी हेगडे, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सदस्य सर्जेराव गाडे, शिवाजी केंगार, रातीलाल केंगार, सोमा तोरणे, परशु आयवळे, हुसेन केंगार, सोमा हेगडे आदी उपस्थित होते.
आ.समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, नागेश हेगडे यांच्या बाबतीत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.
हेगडे कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.
हेगडे कुटुंबाला न्याय हवा तपासात कुचराई झाल्यास उपोषण करू; होलार समाज संघटनेची मागणी
नंदूर येथे मोलमजुरी,ऊसतोड करून उपजिविका करणारे कुटुंब, आज खऱ्या अर्थाने पोलीस खात्याच्या कारवाईत टार्गेट झाले, दारू विक्रेता म्हणून एकाच आठवड्यापूर्वी केसेस करून, कुटुंबातील अनेक सदस्यांना मारहाण केल्याची तक्रार नातेवाईकांनी आक्रोश ठोकून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्याकडे पोलीस खात्यानी दुर्लक्ष केले, पूर्णतः दहशतीखाली असलेले हेगडे कुटुंबास शुक्रवारी पुन्हा केसेस करण्यात आलेल्या पोलिसांमुळेच आपला काळजाचा तुकडा गमविला.हेच सत्य असल्याचे मत होलार समाजाचे तालुकाअध्यक्ष शिवाजी केंगार यांनी सांगितले,
नंदुर गावात अनेकजण दारू विक्रेते आहेत, याची तक्रार पोलिसांकडे असूनही हेगडे कुटुंबाला का टार्गेट करण्यात आले, एकाच आठवड्यात दोनवेळा केसेस करून अखेर पोलिसांच्या हाती काय मिळाले, पोलीस हेगडे कुटुंबाच्या घरी गेले नसते.
पोलिसांची दहशत नसती,पोलीस मागे लागले नसते,तर नागेश हेगडे जीवाची पर्वा न करता पळालाच नसता. यामुळे मयत नागेश नाथा हेगडे याच्या मयताला पूर्णतः जबाबदार पोलीस खातेच आहे, ही गोष्ट वडील नाथा हेगडे यांनी सांगून ही त्याकडे दुर्लक्ष का, घटनास्थळी ही वास्तव परीस्थित समोर असताना,नंदुर गावचे समस्त नागरिक साक्षीदार माणून बोलत असताना,सतत नंदूर गावच्या नागरिकांवर अन्याय होतोय, हे दिसून येत आहे.
तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध व्यवसाय सुरू आहेत, लॉक डाऊन काळातही सर्व धंदे जोमात असताना एखाद्या कुटुंबाला टार्गेट करून,दहशत करून, सतत केसेस करून अखेर एका अल्पवयीन युकाचा बळी घेतलेल्या पोलिसांनी आपले लपवून दुसऱ्यावर बोट करू नये, अन्यथा नागेश हेगडे कुटूंबावर झालेल्या अन्याविरोधात पोलीस खात्यासमोरच उपोषण करू, असा इशारा होलार समाज संघटनेकडून देण्यात आला आहे.
मयत नागेश नाथा हेगडे (वय 24) हा पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून पोलिसाच्या भितीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तो खाली पडून मयत झाल्याची तक्रार पोलिसात नातेवाईकांनी दिली आहे.
यावर कोणत्याही प्रकारे पडदा पडला नसून, हेतू पूर्व कामाने हेगडे कुटुंबाला त्रास देऊन नागेश हेगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर कारवाई तर झालीच पाहिजे, हेगडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे,अशी मागणी होलार समाजाने केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज