मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील सह सोलापूर शहर व जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.
मुख्यता सोलापूर शहरासह बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ तसेच जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा व जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने द्राक्ष, ज्वारीसह हाताशी आलेल्या अन्य पिकांचे मोठे नुकसान होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. २९) रात्री काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये माढा तालुक्यात द्राक्षच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुगीच्या दिवसात अचानक झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे.
शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी काढून ठेवली असून काही ठिकाणी पावासाने भिजून नुकसान झाले आहे. याबरोबर तूर, हरभार, गव्हाचे पावसाने नुकसान झाले आहे. सोलापूर शहरात रात्री १.२० मिनीटानी ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरु होताच सात रस्ता परिसरात विज गायब झाली होती. ऐन उकाड्यात विज गायब झाल्याने नागरिक हैराण झाले.पावसाबरोबर जोरदार वारेही सुरु होते. तर मंगळवेढा,मोहोळ, बार्शी, माढा तालुक्यात काही गारांसह पावसाने हजेरी लावली.
मंगळवेढा परिसरात शनीवारी रात्री एक वाजेपर्यंत ढगाच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे येथील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.ज्वारी, तूर, हरभरा या पिकांच्या राशी भिजुन तोंडाला आलेला घास पुर्णपणे वाया जाण्याची भिती आहे. परिसरात द्राक्ष बागांचे मोठे क्षेत्र झाले. या पावसाने बागेत द्राक्ष घड मनी मोठ्या प्रमाणात पडले आहेत. शेतकऱ्यांसाठी विषेशता द्राक्ष बागायतदारांसाठी हा पाऊस मोठे लाखो रूपयांचे नुकसान करणारा ठरणार असल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज