मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे मुकुंद बापू कसबे (वय ५० रा.नंदेश्वर) हा इसम नंदेश्वर येथील मशिदीजवळ माऊली फुट वेअरच्या बाजूस शनिवार दि.२९ रोजी सकाळी ११.१० च्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्याकडून अंदाजे अंक , आकडयावर पैशाची पैज लावून घेवून कल्याण मटका नावाचा जुगार स्वतःच्या फायदयासाठी खेळत असताना २३५० रुपये व जुगाराचे साहित्य मिळून आले.
याची फिर्याद पो.कॉ मनोहर भोसले यांनी दिली आहे.अधिक तपास पो.हे.कॉ. शहानूर फकिर करीत आहेत.
तसेच मरवडे येथील सिंहगड महाराज मंदिरालगत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे येणारे अंक आकडयावर पैसे लावून कल्याण नावाचा जुगार खेळत असताना आरोपी संतोष गोलाप्पा येडसे (वय ३६ रा .मरवडे) हा शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी दुपारी १. ०० वा . कल्याण नावाचा जुगार खेळत असताना जुगाराचे साहित्य रोख रक्कम १५६० रुपये मुद्देमालासह मिळून आले. याची फिर्याद पो . ना . हरीदास सलगर यांनी दिली असून अधिक तपास पो.हे.कॉ. घोळसगावकर करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज