mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय खेळी! मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मास्टरस्ट्रोक; शिंदे गटाच्या गळाला लागणार मोठा मासा..?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 24, 2024
in राजकारण, राज्य
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांची क्रेज आजही कायम असल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक मास्टरस्ट्रोक खेळत भगीरथ भालके यांना गळाला लावण्याचे काम केले आहे.

याचा मोठा फायदा सोलापूर लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात होणार असून भालके यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल परिवाराला एकत्र राहण्याचे आवाहन तानाजी सावंत यांनी केले.

भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी मेळाव्याच्या उदघाटन समारंभात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला भगीरथ भालके यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बोलावत भाजप आमदार समाधान अवताडे याना शह देण्याचा प्रयत्न केला होता. कार्यक्रमासाठी सांगोल्याचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी भारतनाना आणि गणपतराव देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही,अशा शब्दांत या दोन्ही तरुण नेत्यांना साद घातली.

दिवंगत आमदार भारतनाना यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात घेऊन मोठी ताकद देण्यास सुरुवात केल्याने भगीरथ भालके यांनी आपल्या हजारो समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.

तेलंगणात बीआरएस पराभूत झाल्याने भगीरथ भालके वेगळी वाट शोधत होते. अशात त्यांना शिवसेना आपली वाटू लागल्याने त्यांनी कार्यक्रमाला डॉ तानाजी सावंत याना पाचारण केले होते.

‘भगीरथ याने थोडी चूक केली, काखेत कळसा अशी त्यांची अवस्था झाली’ असे सांगत उशाला तानाजी सावंत होते तर त्यांनी फक्त एक फोन करायला हवा होता असे सांगितले.

यापुढे संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र राहा आणि काहीही गरज पडली तर हा तानाजी सावंत भारतनाना यांच्या प्रमाणे तुमच्या मागे उभा राहील,असे आश्वासन दिले.

आरोग्यमंत्र्यांच्या या मास्टरस्ट्रोकचा फायदा सोलापूर लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात होणार असून विठ्ठल परिवाराची ताकद पंढरपूर , मंगळवेढा , मोहोळ या भागात मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय सांगोला आणि माढा या भागातही विठ्ठल परिवार असल्याने माढा लोकसभेला देखील भगीरथ भालके आणि विठ्ठल परिवार महायुतीची फायदेशीर ठरू शकणार आहे.

भगीरथ भालके यांच्यासोबत भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांनीही यावेळी डॉ तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली . भालके यांचा अजून शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला नसला तरी डॉ तानाजी सावंत यांच्या सोबत राहण्याचे संकेत भगीरथ भालके यांनी दिल्याने कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी ताकद देणारा ठरणार आहे .

असे असले तरी लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यामुळे अनेक प्रश्न उभे राहणार असून डॉ सावंत यांच्या भाषणाने भाजप आमदार समाधान अवताडे आणि शिवसेना आमदार शहाजीबापू यांची काळजी मात्र वाढणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरोग्यमंत्री तानाजी सावंत

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
Next Post
कलाकारांनो! मंगळवेढा काँग्रेस कमिटीतर्फे नवरात्र महोत्सवात लोककला महोत्सवाचे आयोजन; तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची माहिती

मोठी बातमी! काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची 'या' मतदारसंघाच्या निरीक्षक पदी निवड; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली जबाबदारी

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा