टीम मंगळवेढा टाईम्स ।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकपदी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील सर्व २५२ विधानसभा मतदार संघनिहाय काँग्रेस पक्ष निरीक्षक नेमले आहेत. यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांचे विश्वासू व
मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर साळे म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज ओळखून पक्षाने माझी निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडून
दक्षिण विधानसभा मतदार संघातून इंडिया आघाडीच्या उमेदवारास अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने नेमले निरीक्षक
आगामी निवडणुकीचा विचार करून प्रदेश काँग्रेस कमिटीने निरीक्षकांची यादी जाहीर केली. शहर उत्तरची जबाबदारी विनोद भोसले आणि सुधीर लांडे यांच्याकडे असणार आहे. शहर मध्यमध्ये मनीष गडदे यांच्याकडे निरीक्षकपदाची धुरा सोपवली आहे.
दक्षिण मतदारसंघासाठी विधानसभा गणेश डोंगरे आणि प्रशांत साळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
अक्कलकोटसाठी राधाकृष्ण पाटील, पंढरपूरसाठी रमेश हसापुरे, सांगोल्यात अण्णासाहेब इनामदार, माळशिरसमध्ये अभिषेक कांबळे, मोहोळसाठी भीमाशंकर जमादार, बार्शीत मुन्नाभाई हरणमारे, माढ्यात राहुल पाटील, करमाळ्यात सुलेमान तांबोळी यांची निरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज