टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर शहरातील तीन ठिकाणी अन्न औषध प्रशासन, पंढरपूर शहर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात पाच लाख ७६ हजार रुपयांचा विक्रीस बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, तंबाखू आढळून आले. हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून तिन्ही आरोपीना पोलिसांनी अटक केलेली आहे.
या संदर्भात शहर पोलिसांत अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजता
शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांच्यासह पोलिस पथकाच्या मदतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर असलेल्या संजय होनराव ( वय ३३ वर्ष) यांच्या राजलक्ष्मी जनरल स्टोअर्स येथे तपासणी केली असता
विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू, चंदन सुपारी, सुपर जेम मसाला, एम. सुगंधित तंबाखू, राजू इलायची यांचा ७२ हजार ५१५ रुपयांचा साठा आढळून आला.
तर भोसले चौकातील अजीज अब्दुल तांबोळी ( वय ४८) याच्या गोदामात आरएमडी पानमसाला, एम. सुगंधित तंबाखू, रत्ना सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पानमसाला,
विमल पानमसाला, व्हीआय सुगंधित तंबाखू, राजू सुगंधित सुपारी याचा एकूण ५ लाख १ हजार ३२० रुपये किमतीचा विक्रीस बंदी असलेल्या गुटखा साठा आढळून आला.
तसेच जुनी कोळी गल्ली येथील सागर उत्तम अभंगराव (वय ३८) याच्या घरी तयार मावा, सुगंधित तंबाखू, असा २ हजार ६०० रुपयांचा माल आढळून आला.
हा सर्व माल अन्न औषध प्रशासनाने जप्त केला असून त्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन तो जप्त माल पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिला आहे.
या प्रकरणातील आरोपी संजय होनराव, अजिज तांबोळी, सागर अभंगराव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात सर्रास गुटखा विक्री होत आहे. यावरही कारवाई करावी अशी मागणी आता महिला वर्गातून पुढे येऊ लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज