टीम मंगळवेढा टाईम्स
इन्स्टाग्राम या सोशलवमीडिया अॅपच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांपूर्वी एका तरुणाशी मैत्री करून त्याला आपला मोबाइल नंबर देऊन कुईवाडी येथे भेटावयास बोलाविले.
त्यानंतर आपला नवरा व अन्य एकाच्या साथीने काठीने व दगडाने मारहाण करून २५ हजारांना लुटले. ही घटना ७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास परंडा रोड, कुईवाडी येथे घडली.
याबाबत मयूर बाबासाहेब गवंडी (वय ३०, रा. जळगाव नेवूर, ता. येवला) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल करताच काही तासांतच पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली.
यात ती तरुणी कोमल काळे (वय २४), अमोल धनंजय खंदाड (वय ३२ वर्षे, रा. वैराग, ता. बार्शी), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर अन्य एकाचा शोध पोलिस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मयूर गवंडी याची मागील ०८ दिवसांपासून इन्स्टाग्राम या सोशल अॅपवरून कोमल हिच्याबरोबर ओळख झाली होती. यात तिने मोबाइल नंबर देऊन ७ मार्च रोजी मयूर यास कुडूवाडी येथे भेटण्यास बोलाविले होते.
तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो त्याच्या मोटासायकलवरून कुडूवाडीत आला होता. त्यानंतर त्याला रात्री आठ वाजता कोमल हिने मी परंडा रोडला थांबली आहे,
तू इकडे ये म्हणून सांगत त्याला भेटली. त्यानंतर फिर्यादीला पाण्याच्या टाकीमागील बाजूस मोकळ्या पटांगणात घेऊन गेली,
तोपर्यंत तिच्या पाठीमागून आलेल्या दोन आरोपींनी काठीने पायावर व दगडाने पाठीत फिर्यादीस मारले व खिशातील ५ हजार रुपयांचा मोबाइल व २० हजार रुपये रोख रक्कम, असा २५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला व लुटमार केल्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले.
दोन तासात दोघांना अटक; एकाचा शोध सुरू
शुक्रवार, ८ रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करताच तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रीतम यावलकर,
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुरेश चिल्लावार, सहा. पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, सारिका गटकुळ, संतोष मोरे, केशव झोळ, प्रशांत किरवे, दादासाहेब सरडे यांच्या पथकाने तपास केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज