टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू येथे रविवार दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य पोटविकार तपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
सोलापुरातील एमबीबीएस, डीएनबी मेडिसिन, डीएनबी गेस्ट्रोलॉजी एम.एन.ए.एम.एस असलेले सुप्रसिद्ध डॉक्टर स्वानंद रेडेकर तपासणी करणार आहेत.
या शिबिरा प्रसंगी गॅस्ट्रोस्कॉपी फक्त 1500 रुपयांत करण्यात येणार आहे. तर त्यादिवशी ओपीडी बेसवर गेट्रोस्कॉपी करण्यात येईल.
दरम्यान, रक्ताच्या तपासणीवर 5 टक्के सूट तर मेडिकल दुकानांमध्ये 5 टक्के सूट देण्यात येणार आहे.
तरी या शिबिरास सर्वांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशी लक्षणे असलेल्या पेशंटनी शिबिरात मोफत तपासणी करण्यात येणार आहे
ऍसिटीडी, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, कावीळ, भूक कमी लागणे, मूळव्याध, शौचाच्या तक्रारी, वेदना होणे, अपेनडिक्स, बद्धकोष्टता, शौचास खडा होणे,
रक्ताची उलटी शौचावाटे रक्त जाणे, इत्यादी लक्षणे असतील तर शिबिरामध्ये डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. संपर्कासाठी फोन नंबर 9021578180/8956650654
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज