टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील प्रसिद्ध ‘बंजारा हिल्स’ हॉटेलवर अज्ञाताने भ्याड हल्ला करत पेट्रोल टाकून हॉटेल पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या आगीत हॉटेलमधील महत्त्वपूर्ण उपकरणांसह सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून, याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी गोपाळ किसन राठोड यांचे बालाजीनगर परिसर येथे ‘बंजारा हिल्स’ नावाचे हॉटेल आहे.

दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास, हॉटेल चालू असतानाच एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या पाठीमागील जाळीचा फायदा घेत आत पेट्रोल ओतले आणि आग लावून पळ काढला.

क्षणार्धात पसरलेल्या या आगीत हॉटेलमधील
दोन फ्रीज, टीव्ही, ग्रेव्ही मशीन, इनव्हर्टर संच, लाकूड कापण्याची मशीन, इलेक्ट्रिक वायरिंग व इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून व्यवसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ऐन गर्दीच्या आणि व्यवसायाच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी गोपाळ राठोड यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास महिला पोलीस हवालदार वंदना अहिरे (घोडके) या करत आहेत.
आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










