mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 13, 2026
in सोलापूर
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):

दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावाच्या आरोग्यासह शांतता टिकवण्यासाठी दर्गणहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामस्थांनी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावात दारू पिणाऱ्यास तब्बल १० हजार रुपयांचा दंड आणि वर्षभरासाठी ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधांपासून वंचित ठेवण्याचा धाडसी ठराव दर्गणहळ्ळीच्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

​’नशामुक्त युवा फॉर विकसित भारत‘ अंतर्गत पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानातून प्रेरणा घेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी या संपूर्ण दारूबंदीचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडला.

“दारूमुळे कुटुंबातील आनंद हिरावला जातो, आरोग्य ढासळते आणि संसार उद्ध्वस्त होतात. ही परिस्थिती रोखायची असेल तर दारूबंदी हाच एकमेव प्रभावी पर्याय आहे,” असे मत महेश बिराजदार यांनी मांडले. त्यांच्या या प्रस्तावाला संपूर्ण ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

​नियमांचे उल्लंघन केल्यास थेट बहिष्कार आणि ‘हे‘ कडक नियम:

​१० हजार रुपये दंड: गावात कोणताही नागरिक दारू पिताना आढळल्यास त्याला थेट १० हजारांचा आर्थिक दंड ठोठावला जाईल.

​ग्रामपंचायतीच्या सुविधा बंद: दोषी व्यक्तीला दाखले (दाखले/प्रमाणपत्रे), शासकीय योजनांचे लाभ आणि पाणीपुरवठा यांसारख्या ग्रामपंचायतीच्या सर्व भौतिक सुविधांपासून वर्षभरासाठी वंचित ठेवले जाईल.

​दारू विक्रेत्यांवरही कारवाई: दारूची विक्री करणारा आणि त्याला मदत करणारा, दोघेही तितकेच दोषी मानले जातील आणि त्यांच्यावरही कडक कारवाई होईल.

​जामीनदारावर सामाजिक बहिष्कार: दारू पिऊन गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जामीन देणाऱ्यावरही गावात बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

​दर्गणहळ्ळी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या आक्रमक आणि कौतुकास्पद निर्णयाचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून जोरदार स्वागत केले जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या 'चेज रिपोर्ट' प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

ताज्या बातम्या

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा