मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. वीस वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला असून डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत
नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा म्हणत गर्दी केली होती. लोहा तालुक्यातील उमरगा तांडा येथील महिलेला नांदेडमधील ‘फोर्टिज स्टार ‘ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
रात्री सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर महिलेला अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे तिला तात्काळ दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र काल उपचारादरम्यान सकाळी तिचा मृत्यू झालाय.
महिलेचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर रुग्णालय चालक कुलूप लावून पसार झाल्याचे समोर आले. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरण ताजे असताना नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेने त्यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
आरती राठोड ही तरुणी काही दिवसांपूर्वी नांदेडमधील फोर्टीज स्टार हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. रविवारी रात्री तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र, ऑपरेशननंतर आरतीला अती रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर तिला तत्काळ दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काल सकाळी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाकडे माहिती घेतली असता, संबंधित हॉस्पिटलला कुलूप लावलेले आढळून आले आणि डॉक्टर व कर्मचारी पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गर्दी करत आरोग्य प्रशासन व संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी आरोग्य यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज