मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
एसटीच्या प्रवासात आता पुरूषांनाही विशेष सवलत मिळणार आहे, याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते.
एसटीच्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी रविवारी घोषणा केली. त्यानुसार आता महिलाच नव्हे तर पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे. त्यासाठी नेमकी
एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली.
कमी गर्दी असणाऱ्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली.
फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.
फ्लेक्सी फेअर योजना नेमकी काय आहे ?
जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो.
त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येतेय.
तिकिटामध्ये किती कपात होणार ?
समजा, दादर ते स्वारगेट यादरम्यान ई शिवनेरी बसचे तिकिट ६०० रूपये आहे. जर गर्दी कमी असणाऱ्या हंगामात तुम्ही आधीच तिकिट बुक केले. तर हे तिकिट तुम्हाला ५१० रूपयांना मिळेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज