मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांना गोव्यात येता यावे, यासाठी फ्लाय ९१ विमान कंपनीने तिकिट दरात ३०० रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्याला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
गोव्याला जाणाऱ्या पहिल्या दोन फ्लाइटचे तिकिट पूर्णपणे बुकिंग झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात सोलापूरसह गोव्याला जोडणाऱ्या प्रमुख पाच मार्गांचाही समावेश आहे.
ही ऑफर केवळ १ ते ३० जून या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल. त्या तिकिटांवर ३१ ऑगस्टपर्यंत प्रवास करता येईल.
पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत असे आवाहन गोवा सरकारने केले होते.
त्यानुसार फ्लाय ९१ या विमान कंपनीने सवलतीची योजना जाहीर केली आहे. ही सवलत गोवा येथून हैदराबाद, जळगाव, अगत्ती, पुणे, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या मागाँवर लागू होईल. याशिवाय पुणे-सिंधुदुर्ग, बंगळुरु -सिंधुदुर्ग,
हैदराबाद -सिंधुदुर्ग, जळगाव हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा – सोलापूर या मार्गांवर देखील ही ऑफर लागू असणार आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्णय
प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करण्याचा प्रयत्न आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला पाठिंबा देत ही योजना आखली आहे.” मनोज चाको, सीईओ, फ्लाय ९१ एअरलाइन्स
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज