मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
आई-वडिलांना सांभाळण्याच्या मोबदल्यात शेतजमीन लिहून घेतलेल्या मुलाकडून वृद्ध आईला न सांभाळता मारहाण करून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार आळजापूर (ता. करमाळा) येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी वृद्ध आईने थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरुद्ध फिर्याद दिली आहे. मच्छिंद्र नाना काळे, असे गुन्हा नोंदलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत कौसाबाई नाना काळे (वय ६५, रा. आळजापूर, ता. करमाळा) यांनी १५ एप्रिल रोजी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

यात म्हटले आहे की, त्यांच्या दोन मुलांपैकी मच्छिंद्र नानासाहेब काळे यांनी वडील नाना काळे हे मयत होण्याच्या अगोदर आई व वडिलांना सांभाळण्याचे कबूल करून वडिलांकडून जमीन नावावर करून घेतली होती.

मात्र, काही दिवसांनी वडील मयत झाल्यानंतर मुलगा मच्छिंद्र याने फिर्यादी आईला घराच्या बाहेर काढले. औषधोपचारासाठी खर्च न करता उपाशीपोटी मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास फौजदार ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

जिवे मारण्याची दिली धमकी
घरातून हाकलून दिल्यानंतर फिर्यादी कौसाबाई या मच्छिंद्र यांच्या नावे असलेल्या शेतामध्ये छपराचे घर करून राहत होत्या. नंतर कौसाबाई यांना ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाल्याचे समजल्यानंतर १४ एप्रिल रोजी सकाळी ९च्या सुमारास मच्छिंद्रने ‘तू माझ्या रानात घर बांधायचे नाही’ असे म्हणत मारहाण करीत आईला जिवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले.
फिर्यादीची आई कौसाबाई यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी त्यांचा मुलगा मच्छिंद्र काळे यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














