मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वारीसाठी पायी चालून आलेल्या वारकऱ्यांचा थकवा घालविण्यासाठी पाय दाबण्याचे मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय पाऊस आल्यास वारकऱ्यांसाठी ५ ते १० हजार स्क्वेअर फुटाचे टेंट उभारण्यात येणार आहेत.
यावर्षी प्रथमच जर्मन पद्धतीचे टेंटही पालखी तळावर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक पालखी तळावर व मार्गावर आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी दिली.
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस लवकर पडल्यामुळे शेतकरी पेरणी, शेतीची कामे आटोपून आषाढी यात्रा सोहळ्याला हजेरी लावू शकतात. त्यामुळे पालखीतील वारकऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पालखी मुक्कामाचे स्थळ व पालखी मार्गावर नियोजन सुरू आहे.
प्रत्येक वर्षी मुक्कामाच्या ठिकाणी पालखीतील भाविकांसाठी आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शौचालय, हिरकणी कक्ष, लाइट आर्दीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून पालखी तळावर वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी जर्मन पध्द्तीचे टेंट उभारण्यात येणार आहेत
वारकऱ्यांना स्कॅनरवर मिळणार सेवासुविधा
नातेपुते नगरपंचायतीच्यावतीने यावर्षी नगरपंचायत मुख्य रस्त्यावर सर्वत्र नगरपंचायत स्कॅनर लोगो लावणार आहेत, ज्या व्दारे तो स्कॅन केले तर सर्व सेवा सुविधा आणि अधिकारी यांचे संपर्क मोबाईल नंबरची माहिती मिळणार आहे.
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते मुक्कामी ३० जूनला येत असून त्यानिमित्त नातेपुते नगरपंचायतच्यावतीने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पालखी मार्गावर रस्ते खडेमुक्तची पालखी सोहळ्यासाठी १२०० शौचालय उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कामं, गावातील कचरा घंटागाड्यात गोळा केला जात आहे. भाविकांना सेवासुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांनी सांगितले. नातेपुते पालखी तळ व परिसर पूर्णतः स्वच्छ केला जाणार आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत. कचरा घंटागाड्यांत गोळा करण्याची तयारी सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत मोटारी दुरुस्त केल्या आहेत. तसेच पालखी, टीसीएल व तुरटी खरेदी करून स्वच्छ पाणी देणार आहेत.
आषाढी वारी मुक्कामी पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी नातेपुते नगरपंचायतीवर आर्थिक ताण पडत आहे. गेले तीन वर्षे कोणत्याही प्रकारचा निधी नगरविकास विभागाकडून उपलब्ध होत नाही. शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
पालखी तळावर सर्व विद्युत तारा काढून फक्त जनरेटरवर विद्युत पुरवठा चालू ठेवला जाणार आहे. शहरातील सर्व पाणीपुरवठा जनरेटरवर सुरू ठेवला जाईल. विद्युत महावितरण मंडळावर नातेपुते नगरपंचायत अवलंबून राहणार नाही.-अतुल पाटील, उपनगराध्यक्ष, नातेपुते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज